Palghar Earthquake : पालघरमधील डहाणू, तलासरी भागात पुन्हा भूकंपाचे धक्के, तीव्रता 3 रिश्टर स्केल

Palghar : पालघर मध्ये आज दुपारी 12. 52 वाजता पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे डहाणू घोलवड तलासरी धुंदलवाडी बोर्डी या परिसरात तीन रीस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा धक्का जाणवला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल आहे पालघर जिल्ह्याच्या डहाणू तलासरी भागात मागील तीन वर्षांपासून लहान मोठ्या भूकंपाच्या हादऱ्यांचे सत्र सुरूच असून हे हादरे मागील सात महिन्यांपासून बंद झाले होते मात्र आज पुन्हा एकदा भूकंप जाणवण्यास सुरुवात झाली आहे सुदैवाने आजपर्यंत या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे मोठी जीवित हानी झाली नसली तरी सतत बसणाऱ्या धक्क्यांमुळे या परिसरातील घरांना तडे गेले असून या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola