Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ

Continues below advertisement

मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या डहाणू तालुक्यातील विवळवेढे कातकरीपाड्यात, आजही पाण्यासाठी पायपीट सुरू आहे... एकीकडे शासनाच्या जल जीवन मिशनच्या मोठमोठ्या घोषणा सुरू आहेत.मात्र दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आजही आदिवासी कातकरी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. विवळवेढे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कातकरीपाड्यावर ग्रामस्थांना जनावरं ज्या डबक्यातून पाणी पितात, त्याच डबक्यातून दूषित पाणी भरून आणावं लागत आहे. डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र महालक्ष्मी मंदिर असलेल्या विवळवेढे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कातकरीपाड्यावर आजही पाण्याचा गंभीर प्रश्न कायम आहे. तब्बल 250 ते 300 लोकवस्ती असलेल्या या पाड्यात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. माणसं आणि जनावरं एकाच डबक्यावर तहान भागवतायत... किती विदारक परिस्थिती आहे या कातकरी पाड्यावर याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहुया... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola