Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
नागपूर सीमेलगतच्या कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये CDV विषाणूमुळे पाच वाघांचा मृत्यू झालाय, त्यामुळे संपूर्ण वन विभाग अलर्टमोडवर आलाय.. कुत्र्यांमधून वाघांपर्यंत पोहोचणारा हा संसर्ग आता महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठीही धोक्याची घंटा मानला जातोय... कान्हा व्याघ्र प्रकल्पातील सरही सेक्टर... दाट जंगल... आणि आता भीतीचं सावट... 21 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान टी-141 या वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा एकामागोमाग मृत्यू झाला... सुरुवातीला मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट नव्हतं... मात्र जबलपूर येथील प्रयोगशाळेच्या तपासणीनंतर धक्कादायक माहिती समोर आली.. या पाचही वाघांचा मृत्यू “केनाईन डिस्टेंपर वायरस” म्हणजेच CDV मुळे झाल्याचं निष्पन्न झालं.. विशेष म्हणजे हा विषाणू मूळतः कुत्रावर्गीय प्राण्यांमध्ये आढळतो...मात्र आता तो वाघ आणि बिबट्यासारख्या मांजरवर्गीय प्राण्यांमध्येही दिसून येतोय... वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, जंगलालगतच्या गावांमधील संक्रमित कुत्रे हा संसर्गाचा मुख्य स्त्रोत ठरू शकतात... नेमका हा विषाणू कसा पसरतो आणि प्रशासन कोणती पावलं उचलतंय, पाहूया हा रिपोर्ट...