CM Eknath Shinde Palghar Update : मुख्यमंत्र्यांनी बोलावली पालघरमधील वाढवण बंदरविरोधी समितीची बैठक

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालघरमधील प्रस्तावित वाढवण बंदरविरोधी समितीची बैठक बोलावली आहे. या बंदराचं भूमिपूजन १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचं नियोजन आहे. मात्र, वाढवण बंदर उभारणीला स्थानिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. हा विरोध कसा कमी होईल यासाठी मुख्यमंत्र्यांनी बंदरविरोधी संघर्ष समितीची आज मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. प्रस्तावित वाढवण बंदर उभारणीला एमसी झेडएम प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. बंदरासाठी असणारा रस्ता आणि रेल्वेसाठी लागणारी ५७१ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून, यासाठी केंद्रीय अधिसूचना६ फेब्रुवारीला काढण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram