Pakistan Plane Crash | कराचीत उतरताना विमान रहिवासी वस्तीत क्रॅश,अपघातात आतापर्यंत 85 प्रवाशांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कराची विमानतळाजवळ उतरण्यापूर्वी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) विमान कोसळून मोठा अपघात झाला. पीआयएचे प्रवक्ते अब्दुल सत्तार यांनी विमान कोसळल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. या ए-320 विमानात एकूण 107 लोक होते. पैकी 99 प्रवासी आणि क्रूचे आठ सदस्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 15 ते 20 लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. हे विमान सुमारे दहा वर्ष जुने आहे.