पाकिस्तान एअरलाईन्सचं विमान रहिवासी वस्तीत कोसळलं, विमानात 100 प्रवासी असल्याची माहिती
कराची विमानतळाजवळ उतरण्यापूर्वी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) विमान कोसळून मोठा अपघात झाला. पीआयएचे प्रवक्ते अब्दुल सत्तार यांनी विमान कोसळल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. या ए-320 विमानात एकूण 107 लोक होते. पैकी 99 प्रवासी आणि क्रूचे आठ सदस्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 15 ते 20 लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. हे विमान सुमारे दहा वर्ष जुने आहे.