Pahalgam Terror Attack Video : मेरे पती को मार दिया...भारती सैन्याला पाहताच महिलेनं टाहो फोडला

Pahalgam Terror Attack Video : मेरे पती को मार दिया...भारती सैन्याला पाहताच महिलेनं टाहो फोडला

 भारताचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या भूमीवर पुन्हा एकदा दहशतवादाने थैमान घातले आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हल्लेखोरांनी भारतीय नागरिकांना त्यांचे नावे आणि धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असल्याचे सांगितले जात आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे जगभरात संतापाची लाट पसरली असून सर्वत्र या घटनेचे पडसाद उमटतांना दिसत आहे 

हे ही वाचा..
पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेत 8 ते 10 दहशतवादी सहभागी असू शकतात. स्थानिक मदतनीस असलेले 2 ते 3 दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात असल्याचा संशय आहे. त्याच वेळी, 5 ते 7 दहशतवादी पाकिस्तानी वंशाचे असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या हल्ल्यात पहलगाममधील दोन स्थानिक मुस्लीमांना सुद्धा गोळ्या घालण्यात आल्या आहेत. यानंतर मृताच्या आईने घरातील एकमेव हात गेल्याने आक्रोश केला. तो घोडा चालवत होता आणि घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती, असे धाय मोकलून रडत सांगितले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola