Gym Warning Special Report : व्यायामाचा अतिरेक, जीवाला धोका, तरुण थोडक्यात बचावला

Gym Warning Special Report : व्यायामाचा अतिरेक, जीवाला धोका, तरुण थोडक्यात बचावला


जिमच्या माध्यमातून कमालीचे पिळदार शरीर तयार करण्याच्या नादात नागपूर तरुणाई आपल्या जिवाशी खेळत असल्याचे धक्कादायक वास्तव नागपूरच्या एका घटनेने समोर आले आहे.

नागपूर मध्ये एका २३ वर्षीय तरुणाची अतिव्यायामामुळे मेंदूतील रक्तवाहिनी फाटली (आर्टरी डिसेक्शन) , सुदैवाने डॉक्टरांनी 'गोल्डन अवर'मध्ये शस्त्रक्रिया करून त्या तरुणाला मृत्यूच्या दाढेतून परत आणले, मात्र या घटने नंतर अति व्यायाम करणाऱ्या तरुणांनी काळजी घेण्याची गरज आहे.

१० एप्रिलला ओम भोयर नेहमीप्रमाणे जिम मध्ये गेला. तेथे त्याने शासरिक क्षमतेपेक्षा अति ताण सहन करत जिम मारायला सुरवात केली. त्यामुळे त्याची मेंदूची रक्तवाहिनी फुटली. लगेच त्याचे डोके दुखायल लागले, उलटी झाली मात्र ओम् च्या ही बाब लक्षात आली नाही. काही तासाने त्याला अस्वस्थ वाटू लगले व पुढे त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले.

अति व्यायाम करणे हे नेहमीची धोकादायक असते, प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची क्षमता वेगळी असते, त्यामुळे किती ताण सहन करून व्यायाम करायचा हे स्वतःच त्या व्यक्तीने ठरवावे असा सल्ला ओमची शास्त्रक्रिया करणारे डॉक्टर सचिन ढोमणे यांनी दिला आहे. 


JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola