Ajit Pawar NCP Special Report : दादांचा पक्ष, तिघांचं लक्ष, कुणावर काय जबाबदारी?

Continues below advertisement

Ajit Pawar NCP Special Report : दादांचा पक्ष, तिघांचं लक्ष, कुणावर काय जबाबदारी? 

 राज्यात होत असलेल्या बारामती (Baramati) पोटनिवडणुकीकडे आज सर्वांचे लक्ष लागले असून सुनेत्रा पवार यांनी भल्या सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावत सर्व बारामतीकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज पोटनिवडणूक होत असून पवार कुटुंब या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार आज स्वत: मतदानाला उपस्थित नसले तरीही त्यांनी सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांना मतदान करण्याचं आवाहन बारामतीकरांना केलंय. त्यामुळे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात असलेले पवार कुटुंब या निवडणुकीत एकत्र दिसून आलं. मात्र, 2029 च्या निवडणुकीची देखील चर्चा या अनुषंगान होत आहे. त्यातच, युगेंद्र पवार (Yugendra pawar on baramati) यांनी 2029 च्या निवडणुकीसंदर्भाने मोठं वक्तव्य केलंय. 

रोहीत पवार यांनी 2029 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्यावर युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका मांडली. 2029 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात, जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते असं जे रोहित पवार म्हणाले ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. यापूर्वी लोकसभेला आणि विधानसभेला पवार विरुद्ध पवार असं  एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख आहे. पण, आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलेलो आहेत. आता पवार विरुद्ध पवार लढाई नको, तशी आमची इच्छाही नाही, अशा शब्दात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युगेंद्र पवार यांनी परखडपणे भूमिका मांडली.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola