Tanaji Sawant : तानाजी सावंत यांना मोठा दिलासा , 21 शुगर समूहाची याचिका फेटाळली Osmanabad
राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांना मोठा दिलासा मिळालाय. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा साखर कारखाना मंत्री सावंत यांच्या भैरवनाथ साखर उद्योग समूहाला भाडेतत्वावर देण्याचे आदेश कर्ज वसुली न्यायालयाने दिलेत. सावंत यांच्याविरोधात माजी मंत्री अमित देशमूख यांनी याचिका दाखल केली होती. आता याच याचिकेवर न्यायालयानं सावंत यांना दिलासा दिलाय.