Osmanabad : धाराशिव साखर कारखान्यावरील आयकरची कारवाई संपली
Continues below advertisement
धाराशिव साखर कारखान्यावर सुरु असलेली आयकर विभागाची कारवाई संपलीय.... गुरुवारपासून आयकर विभागाकडून धाराशिव साखर कारखान्याचे तथा डीव्हीपी ग्रुपचे चेअरमन अभिजीत पाटील यांचं कार्यालय आणि कारखान्यावर ही कारवाई सुरु होती... मात्र या कारवाईत आयकर विभागाला बेहिशेबी रोकड, सोने किंवा इतर मालमत्ता आढळली नाही अशी माहिती अभिजीत पाटील यांनी दिलीय... तसंच दिलेल्या माहितीमुळे आयकरचे समाधान झाल्याचंही त्यांनी सांगितलंय... राजकीय विरोधकांनी हे षडयंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी केलाय... तसंच त्यांनी आता पलटवाराला सामोर जावं असा इशाराही त्यांनी दिलाय...
Continues below advertisement