OMICRON:ओमायक्रॉनचा रूग्ण दुबईला पसार
कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले, त्यापैकी दक्षिण आफ्रिकेतून आलेला रुग्ण दुबईला पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. एक जण ६६ वर्षीय असून दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळले. त्यांना कोणतीही लक्षणं नव्हती. त्यांना विलगीकरणात राहण्यास सांगितले. पण जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल येण्य़ाआधीच खासगी प्रयोगशाळेकडून निगेटिव्ह कोरोना अहवाल घेऊन आठवडाभरापूर्वी ते दुबईला गेले. जगभरात ओमायक्रॉननं टेन्शन वाढवलंय. त्यामुळे भारतात खबरदारी घेतली जातेय. असं असताना बंगळुरूमधून रुग्ण अशापद्धतीनं देशाबाहेर गेल्यानं यंत्रणेचा बेफिकीरपणा पुन्हा उघड झालाय.