Pune Protest | डिसेंबरपासून पगार नाही, पुण्याच्या सिंहगड नवले रुग्णालय कर्मचाऱ्यांचं आंदोलन, कोरोनाबाधितांवर उपचार सुरू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 May 2020 09:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यात सिंहगड परिसरात असलेल्या नवले हॉस्पिटलमध्ये डिसेंबर महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार न मिळाल्याने आज सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केलं. यामध्ये नर्स, हेल्पिंग स्टाफ या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पुण्यात कोरोना रुग्णाचा आकडा रोज वाढत आहे. या हॉस्पिटलमध्ये 80 कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. तर 60 जण आयसोलेशन मध्ये आहेत. आंदोलन सुरु असलं तरी कोरोना रुग्णांचे हाल होऊ देणार नाही अशी ग्वाही आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली आहे.