Pandharpur Protest | मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन पण विनामास्क फिरत गर्दी करून नियमांचे तीनतेरा

पंढरपूर : आम्ही नियम मोडण्यासाठीच इथं आलोय. मंदिरं खुली करण्यासाठी ही गर्दी झाली आहे. मंदिरं खुली करावी या लोकांच्या भावना आहेत. लोकं एकत्रित जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही, हे आम्हाला सरकारला दाखवायचं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. कोणतीही कारवाई करा आम्ही आंदोलन करणारच, असं आंबेडकर यावेळी म्हणाले. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आता त्यांची वाट पाहात आहे. त्यांचा निरोप काय येतो ते पाहू, त्यानंतर मी विठ्ठल मंदिरात जाणार आहे, असं आंबेडकरांनी यावेळी म्हटलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola