Pranab Mukherjee Passes Away | भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन, वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास
नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आज वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुत्र अभिजीत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु होते. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.