Ganeshotsav 2020 | परभणी जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, फक्त घरगुती गणेशोत्सव साजरा होणार

गणेशोत्सव म्हटलं की ढोलताशे, मिरवणूक, गुलाल, धम्माल मस्ती आली, मात्र यंदा कोरोनामुळे या सर्वावर बंधनं आली आहेत त्यामुळे परभणी शहरासह जिल्ह्यात एकही सार्वजनिक गणेशाची स्थापना करण्यात आली नाही. त्यातल्या त्यात बाजारातही परभणीकरांनी शिस्तीचे दर्शन घडवले आहे. ज्या बाजारात आजच्या दिवशी पाय ठेवायला जागा नसते त्याच शहरातील गांधी पार्क, शिवाजी चौक या मुख्य बाजारात अत्यंत शिस्तीने नागरिकांनी घरगुती गणपतीच्या खरेदी बरोबरच इतर साहित्य खरेदी केले. प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करूनच परभणीकर घराबाहेर पडले आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने परभणीकरांनी करून दाखवलं असंच म्हणावं लागेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola