Anuj Singh on Rhea's Arrest | रियाला आता कुणीही वाचवू शकणार नाही, रियाच्या अटकेनंतर सुशांतच्या भावाची प्रतिक्रिया
मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्श्न प्रकरणी अखेर आज रिया अटक झाली. एनसीबीने ही कारवाई केली आहे. आज चौकशीच्या तिसऱ्या दिवशी एनसीबीने रियाला अटक केली. आतापर्यंत या प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीताही समावेश आहे. त्यातील सात जण या तपासाशी थेट संबंधित आहेत तर एनडीपीएस कायद्यातील कलमांतर्गत चौकशी सुरू झाल्यानंतर दोघांना अटक केली गेली.
Tags :
Anuj Singh Ssr Drug Connection Rhea Chakraborty Arrested Rhea Chakraborty Arrest Drug Case Gupteshwar Pandey Bihar DGP Sushant Singh Sushant Singh Rajput Rhea Chakraborty