बटरमध्ये दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढवण्याची नितीन गडकरींची मागणी,दूध आंदोलनाच्या मुद्द्यावर PMOला पत्र
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पीएमओला पत्र लिहीत एक महत्त्वाची मागणी केली आहे. बटर बनवताना वापरल्या जाणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढवावा अशी मागणी या पत्राद्वारे ग़करींनी केली आहे. सध्या महाराष्ट्र, गुजरात आणि हरियाणामध्ये दुधाच्या मुद्द्यावर वाद सुरू आहेत. नितीन गडकरींच्या या पत्राची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने यासंबंधी खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.