BMC on Vinay Tiwari | पाटण्याच्या पोलीस अधीक्षकांना क्वॉरन्टाईन करण्याचं कारण बीएमसीकडून स्पष्ट
Continues below advertisement
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहारहून मुंबईत पोहोचलेले पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने होम क्वॉरन्टाईन केलं. यानंतर बरीच चर्चा रंगू लागली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही यावर नाराजी व्यक्त केली. मुंबई महापालिकेनेही यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तिवारी यांचं होम क्वॉरन्टाईन नियमानुसारच असून देशांतर्गत विमान प्रवास केल्याने पाटणा एसपी यांना होम क्वॉरन्टाईन केल्याचं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिलं. तिवारी यांना गृह अलगीकरणाची सविस्तर माहिती दिली होती. अलगीकरणातून सूट देण्यासाठी मुंबई महापालिका तयार आहे, मात्र त्यासाठी नियमानुसार अर्ज करणं गरजेचा असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं.
Continues below advertisement