Uddhav Thackeray | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या अश्रूचा बांध फुटला | पुणे | ABP Majha
Continues below advertisement
अवकाळी पावसानं सर्वस्व हिरावलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बांधावर उतरले. मराठवाड्यातील नांदेडच्या कंधार, लातूर, बीडमध्ये त्यांनी झालेल्या नुकसानाची पाहणी केली. कंधार तालुक्यातील किरोडा गावात उद्धव ठाकरेंसमोर आपली व्यथा मांडताना शेतकऱ्याच्या अश्रूचा बांध फुटला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनीही त्या शेतकऱ्याची आस्थेनं चौकशी करत त्यांचं सांत्वन केलं. तर दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील सुनेगाव सांगवी गावात भेट दिल्यावर एका शेतकऱ्यानं तुम्ही जाणते राजे आहात. तुम्हाला शेतकऱ्यांची मदत करावी लागले, असं हक्कानं बजावलं. तेव्हा आपण जाणते राजे नाही, पण शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहू असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलंय.
Continues below advertisement