Delhi Police Protest | राजधानी दिल्लीत वकील विरुद्ध पोलीस संघर्ष पेटला | ABP Majha
Continues below advertisement
राजधानीत खाकी विरुद्ध काळे कोट असा वाद उफाळून आला आहे. दिल्ली पोलीस आणि काही वकिलांमध्ये पार्किंगच्या कारणावरुन वाद झाला होता. यावरुन तीस हजारी कोर्टात वकील आणि पोलिस यांच्यात हाणामारी झाली. याच पार्श्वभूमीवर आज शेकडो पोलिसांनी दिल्ली पोलिस मुख्यालयासमोर निदर्शने केली. आम्हाला मानवाधिकार नाही का? असा प्रश्न यावेळी पोलीसांनी उपस्थित केला. यावेळी 'हाउ इज द जोश- लो सर' अशा आशयाचे पोस्टर्सही दाखवले जात आहे.
Continues below advertisement