Sanjay Raut | शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल ही गोड बातमी मुनगंटीवार देतील, संजय राऊतांचा टोला | ABP Majha
Continues below advertisement
: युतीतली कोंडी काही सुटायचं नाव घेत नाही आहे. त्याचंपार्श्वभूमीवर भाजप नेते उद्या राज्यपालांना भेटायला जाणार आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपने भूमिका स्पष्ट करुन तासही लोटत नाही तोच शिवसेना खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. 145 चं संख्याबळ असेल तर भाजपने राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करावा असं राऊत यांनी भाजपला चिमटा काढली आहे. तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याची गोड बातमी मुनगंटीवारच देतील अशा शब्दात राऊतांनी मुनगंटीवारांना टोला हाणला आहे. तसेच भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्याचंही राऊत म्हणाले.
Continues below advertisement