Husain Dalwai | भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायला हवा : हुसेन दलवाई | ABP Majha
Continues below advertisement
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ देणार नाही, ही आमची (काँग्रेस) आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे. असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी केले आहे. हुसेन दलवाई यांनी आज नुकतेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर दलवाई यांनी भाजपचं सरकार येणार नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे या दोघांमध्ये बंद दाराआड काय चर्चा झाली, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
Continues below advertisement