VIDEO | भिवंडीत नामवंत कंपन्यांच्या पेकेजिंगचे बनावट मटेरियल, 25 कोटींचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त | ABP
Continues below advertisement
भिवंडीत नामांकीत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या नावानं पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे बनावट मटेरियल जप्त करण्यात आले आहे. 25 कोटींहून अधिक रकमेचे हे मेटरियल आहे. किशोर बेरा याच्या गोदामात छापा मारुन पोलिसांनी याचा भांडाफोड केला. त्याच्या गोदामात एचपी, केनॉन , सॅमसंग, इपसोन या नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या नावाचे प्रिंट असलेले पुठ्यांचे बनावट बॉक्स होते. याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या गोदामात छापा टाकला. कॉपीराईट अॅक्ट अन्वये करण्यात आलेली ही देशातील मोठ्या कारवायांपैकी एक कारवाई आहे. दरम्यान या पकेजिंग बोक्सचा वापर ऑनलाइन विक्रीसाठी होतो का ? तसेच या गुन्हा मध्ये कोण कोण सहभागी आहे याचा तपास सुपु आहे.
Continues below advertisement