24 तास लावणी नृत्य सादर करत लातूरच्या सृष्टी जगतापचा नवा विक्रम, आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद!
Continues below advertisement
आशिया बुक ऑफ रेकार्ड मध्ये नाव कोरन्याचा पराक्रम लातूरच्या सृष्टी जगताप केला आहे. अवघ्या 15 वर्षाच्या सृष्टीच्या या विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी लातूरकरांनी मोठी गर्दी केली होती. काल तीन वाजेपासून सृष्टीने लावणी सादर करायला सुरुवात केली होती. मागील चोवीस तासात तीन सतत मराठी लावणी गीतावर नृत्य सादर केले आहे. लातूरच्या दयानंद सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. सर्वच स्तरातील मान्यवरांनी यावेळी याठिकाणी हजेरी लावली होती. सृष्टीला पाठींबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्त्रिया आणि मुली हजर आहेत. रात्रीही मोठ्या प्रमाणात रसिकांनी टाळ्या वाजवत तिला साथ दिली. मराठमोळ्या लावणी या नृत्य प्रकारस जगमान्यता मिळावी हा उददेश समोर ठेवून हा धाडसी निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement