Fountain At BKC | बीकेसीच्या कलानगर जंक्शनवर आकर्षक फाऊंटन, पर्यटकांसाठी हे शिल्प खास आकर्षण!

लॉकडाऊन दरम्यान गावी गेलेले मजूर अद्याप परतलेच नाहीत, त्यामुळे मुंबईतील सारी विकासकामं रखडल्याची कबूली एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए.राजीव यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. मॉन्सून दरम्यान यंदा मुंबईकरांना खड्डेविरहीत रस्ते देण्याचा पूर्ण प्रयत्न होता, मात्र लॉकडाऊनमुळे ते शक्य होऊ शकलं नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मुंबईतील बीकेसी जवळच्या कलानगर जंक्शनवर उभारण्यात आलेल्या फाऊंटनबद्दल माहिती देताना ते बोलत होते. राजीव यांच्या संकल्पनेतून मुख्य जंक्शनवर उभारण्यात आलेलं हे शिल्प म्हणजे मुंबईकरांसाठी आणि पर्यटकांसाठी एक खास आकर्षण ठरणार आहे. येत्या काळात इथं काळाघोडा फेस्टिव्हलच्या धर्तीवर एक कलामहोत्सव आयोजित करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola