
Sharad Pawar Speech : तोच जोश,तोच उत्साह,तीच आक्रमकता; शरद पवारांचं पुन्हा पावसात भाषण
Continues below advertisement
नवी मुंबई: पाऊस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे वेगळंच नातं आहे. असं म्हटलं जातंय की पाऊस हा शरद पवारांसाठी लकी ठरतो. साताऱ्यातील शरद पवारांच्या सभेनंतर (Satara Sharad Pawar Rain Sabha) निवडणुकीचं चित्र पालटल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. आताही राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये एनसीपीच्या महिला बचत गटाच्या मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते अन् त्या ठिकाणीही पाऊस बसरला. शरद पवारांनीही भर पावसात सभेला संबोधित केलं.
Continues below advertisement