Seawoods Grand Central | ग्रॅंड सेंट्रल मॉलकडून सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी, 5ऑगस्टपासून मॉल्स उघडणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनामुळे गेल्या चार महिन्यापासून बंद असलेले मॉल पाच ऑगस्टपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आता मॉल व्यवस्थापनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबईतील सिवूड रेल्वे स्थानकावर असलेल्या ग्रॅंड सेन्ट्रल मॉल मध्ये कोरोना संसर्ग पसरू नये यासाठी सुरक्षेची संपूर्णपणे खबरदारी घेण्यात आलेली आहे. मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं गेटवर स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. ट्रेम्प्रेचर गनच्या माध्यमातून ग्राहकांचे तापमान तपासण्यात येणार, आत प्रवेश करताना हात सॅनिटाईज करण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीचे तापमान जास्त आढळल्यास त्याला मॉलमध्ये बनविण्यात आलेल्या आयसोलेशन रूम मध्ये ठेवून याबाबत मनपा प्रशासनाला कळविण्यात येणार आहे.