E-Pass च्या नावाखाली काळाबाजार करणाऱ्या दलालांचा बंदोबस्त करा अन्यथा मनसे ठोकून काढेल-संदिप देशपांडे
गणेशोत्सवाचे वेध सर्वांनाच लागलेलं आहे. मात्र यंदाचा गणेश उत्सव पारंपरिक पद्धतीने कोकणातच साजरा करण्यासाठी अनेक चाकरमानी हे कोकणाच्या दिशेने जाण्यासाठी उत्सुक आहेत. e-pass च्या नावाखाली कोकणवासियांची काही दलालांमार्फत फसवणूक होत असल्याचे उघड झालेलं आहे. चाकरमान्यांची फसवणूक करणार्या दलालांना महाराष्ट्र निवडणूक नवनिर्माण सेना ठोकून काढेल. असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेला आहे.