Navi Mumbai Missing Children : बेपत्ता मुलांपैकी 9 जण घरी परतले, दोन मुलींचा शोध सुरू

Continues below advertisement

नवी मुंबईतून गेल्या तीन दिवसांत ११ अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याच्या घटनांनी पालक वर्गात चिंतेचं वातावरण आहे. त्यापैकी नऊ मुलंमुली घरी परतली असून, पोलीस दोन बेपत्ता मुलींचा अजूनही शोध घेत आहेत. नवी मुंबई आणि पनवेलमधून गेल्या वर्षभरात ३७१ मुलं आपलं घर सोडून गेल्याची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे. त्यापैकी ३२६ मुलांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. नवी मुंबई आणि पनवेलमधून मुलं बेपत्ता होत असली तरी त्यात अपहरणाचा एकही प्रकार नसल्यानं पालक वर्गाने चिंता करण्याची गरज नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मुलं बेपत्ता होण्यामागे घरगुती कारणं असल्याचं निष्पन्न झालं आहेत. त्यामुळं नवी मुंबई पोलिसांकडून मुलांचं आणि पालकांचं समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील शाळा आणि कॅालेजांमधून समुपदेशन शिबीर राबवण्यात येणार आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram