Navi Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रोसाठी अखेर मुहूर्त ठरला, उद्घाटनाविनाच मेट्रो सेवेत रुजू होणार

नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपासून मेट्रो सुरु करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. बेलापूर ते पेंधर या मार्गावर मेट्रो धावणार आहे. औपचारिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आज दुपारी तीन वाजता मेट्रो सुरु होणार आहे. तर रात्री १० वाजता शेवटची मेट्रो असेल. या मेट्रो मार्गावर ११ रेल्वे स्थानके असून विशेषत: खारघर आणि तळोजामधील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मेट्रो रेल्वे उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने अखेर मेट्रो सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सिडकोला दिले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola