Navi Mumbai च्या खारघर पोलीस ठाण्यात एका नागरिकाचा मृत्यू, Police मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप
नवी मुंबईजवळच्या खारघर पोलीस ठाण्यात एका नागरिकाचा मृत्यू झालाय. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय. क्षुल्लक कारणावरून एका इसमाशी भांडण झाल्यानं ४२ वर्षीय रामसिंग चव्हाण पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना लॉकअपमध्ये ठेवून मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला