Navi Mumbai : सिडकोच्या 4 हजार घरांची सोडत जाहीर, हजारो नागरिकांच्या घराचं स्वप्न पूर्ण
abp majha web team
Updated at:
23 Nov 2022 11:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात आलेल्या चार हजार १५८ घरांची सोडत आज पार पडली. बेलापूर येथील सिडको मुख्यालयाच्या सभागृहात ही सांगणकीय सोडत पार पडली. सिडकोच्या या घरांच्या सोडतीसाठी १६ हजार अर्ज आले होते. या सोडतीत घर लागलेल्या लाभार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून गेली अनेक वाटश भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना आपले हक्काचे घर लागल्याने लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय. तर ज्यांना घरे लागली नाहीत त्यांच्यासाठी उलवे नोड मध्ये घरांची लॉटरी काढण्यात आली असून त्यामध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन सिडको तर्फे करण्यात आले.