Navi Mumbai Crime : कळंबोलीत प्रियकरानं आधी केली प्रेयसीची हत्या नंतर स्वत:चंही जीवन संपवलं

Continues below advertisement

Navi Mumbai Crime : कळंबोलीत प्रियकरानं आधी केली प्रेयसीची हत्या नंतर स्वत:चंही जीवन संपवलं
नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये राहणाऱ्या प्रियकराने घराजवळच राहणाऱ्या आपल्या प्रेयसीची गळा आवळून हत्या करत स्वतः देखील रेल्वे खाली उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. १९ वर्षीय वैष्णवी बाबर आणि २४ वर्षीय वैभव बुरुंगले यांच्यात मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही महिन्यांपासून त्यांच्यात खटके उडत होते. अखेर ऑक्टोबर महिन्यात वैभवने वैष्णवीची हत्या करण्याचा कट रचला. वैष्णवीची हत्या कधी कुठे आणि कशी करणार या सर्व बाबी वैभवने आधीच आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवल्या होत्या. त्याप्रमाणे वैभवने वैष्णवीला खारघर हिलवर घेऊन जाऊन गळा आवळून तिची हत्या केली. आणि स्वतः देखील जुईनगर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली. अखेर सांकेतिक क्रमांक लिहित रचलेल्या कटाचा पोलीस तपासात उलगडा झाला. तो संकेतिक क्रमांक  झाडाचा असल्याचे निष्पन्न झाल्यावर ड्रोनच्या सहाय्याने शोधले असता एक महिन्यानंतर वैष्णवीचा मृतदेह आढळून आला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram