Navi Mumbai APMC Market : नवी मुंबई एपीएमसीचे पाचही मार्केट सुरू राहणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNavi Mumbai APMC Market : नवी मुंबई एपीएमसीचे पाचही मार्केट सुरू राहणार नवी मुंबईतील एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाचही मार्केट आज सुरु राहणार आहेत. मराठा आंदोलनानिमित्त दोन दिवस मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाचही मार्केट बंद होते. आरक्षणासाठी राज्यातून आलेल्या आंदोलकांच्या वास्तव्याची सोय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये केली होती. यामुळे २५ जानेवारीला सर्व मार्केट बंद होते. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने आणि आंदोलकांचा मुक्काम वाढल्याने सलग दोन दिवस मार्केट बंद ठेवावे लागले. शनिवारी मार्केट सुरु करण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत धान्य पुरवठा केला जात होता. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी आज पाचही मार्केट सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.