
MNS Rally in Panvel: मनसेचा पनवेलमध्ये निर्धार मेळावा; महामार्गाच्या दुरावस्थेबाबत भूमिका मांडणार
Continues below advertisement
MNS Rally in Panvel: मनसेचा पनवेलमध्ये निर्धार मेळावा; महामार्गाच्या दुरावस्थेबाबत भूमिका मांडणार मनसेप्रमुख राज ठाकरेंचा आज पनवेलमध्ये निर्धार मेळावा आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला २००७ मध्ये सुरुवात झाली. गेली १६ वर्षे महामार्गाचं काम रखडलेलं आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.. याची दखल मनसेने घेतली असून महामार्गाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. महामार्गाच्या दुरवस्थेबाबत ते आज निर्धार मेळाव्यात आपली भूमिका मांडणार आहेत. सकाळी ११ वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मनसेचा निर्धार मेळावा होणार आहे. मेळाव्याला पनवेल आणि रायगडसह कोकणातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Continues below advertisement