Maratha Reserv ation : मराठा आंदोलकांचा वाशीत मु्क्काम, भाजीपाला-फळ विक्रीला अडथळा
Continues below advertisement
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत मोठी बातमी समोर येत असून, अखेर मनोज जरांगेंनी 'मराठा आरक्षणा'ची लढाई जिंकली आहे. सगेसोयरेसह मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या असून, काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जूस पिऊन मनोज जरांगे आपलं आमरण उपोषण मागे घेणार आहेत. विशेष म्हणजे सगेसोयरे बाबतचा अध्यादेश आजपासूनच लागू होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे. रात्री उशिरा सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय झाला आहे.
Continues below advertisement