Manoj Jarange Navi Mumbai : मनोज जरांगे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष : ABP Majha

Continues below advertisement

मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर  येऊन धडकलाय.  सध्या मनोज जरांगे हे वाशीमधील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पोहचले असून त्यांच्यासोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत.  काल दुपारी लोणावळ्यातुन सुरु झालेला जरांगेंचा प्रवास पहाटेपर्यंत सुरु होता. जरांगेंच्या हस्ते वाशीत झेंडावंदन होईल त्यानंतर त्यांची  वाशीमध्ये सभा होणार आहे... मनोज जरांगेच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय.  कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून जोरदारपणे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा सकाळी जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.. त्यामुळे  मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram