Navi Mumbai : खारघर दुर्घटनेचा चौकशी अहवाल अद्याप गुलदस्त्यात, राज्य सरकारकडून कोणतही भाष्य नाही
नवी मुंबईतील खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे. दहा महिन्यानंतरही दुर्घटनेचा अहवाल सादर झालेला नाही. शिवाय सरकारनेही या अहवालाबाबत भाष्य केलेलं नाही. खारघरमधील या कार्यक्रमात उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे १४ जणांचा मृत्यू झाला होता.