Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार

Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार

अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात भोंदू बाबांचे एकामागोमाग एक धक्कादायक कांड उघड होत आहेत. धर्माचा आव आणून महिलांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या भोंदूंची काळी बाजू समोर येत आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे अब्दूर रशिद उर्फ बाबाजान या भोंदूबाबाने काळी जादू काढण्याच्या बहाण्याने महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.खालापूर येथे एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असून, सांताक्रूझ येथे आई आणि मुलीवर बलात्कार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणांत आरोपीला अटक करण्यात आली.समस्या सुटतील या आशेने मोठ्या संख्येने लोक त्याच्याकडे येत होते. मात्र, वाढत्या गर्दीमुळे कळंबोलीतील सोसायटी सदस्यांनी त्याला घर सोडण्यास भाग पाडले. गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याने कुटुंबासह तेथून पळ काढला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola