Gokul Milk : गुजरातच्या Amul ला, कोल्हापूरचं Gokul दुध देणार टक्कर? नवी मुंबईत उभारली नवी इमारत
महाराष्ट्रात अमूल ब्रॅण्डला टक्कर देण्याचं काम फक्त गोकुळचं दूधच करत असल्याचा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. त्यामुळं गोकुळचं १४ लाख लिटरपर्यंत होणारं उत्पादन वीस लाख वीटरवर नेण्याचं काम लवकरच होईल, असा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मुंबईमध्ये गोकुळच्या दुधाला असलेली मागणी लक्षात घेऊन त्यासाठी नवी मुंबईत दुग्धशाळा विस्तारीकरण आणि दूधसंकलनासाठीच्या नव्या इमारतीचं उदघाटन मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.