Digha Station : लवकरच दिघा स्ठानकाचं होणार उद्घाटन; ठाणे, नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

Continues below advertisement

Digha Station : लवकरच दिघा स्ठानकाचं होणार उद्घाटन; ठाणे, नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

 ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर दिघा या नव्या रेल्वे स्थानकाची भर पडणार आहे. ठाणे ते ऐरोली स्थानकांदरम्यान दिघा हे स्थानक उभारण्यात आले असून, येत्या महिनाभरात त्याचं उद्घाटन होणार आहे. दिघा रेल्वे स्थानकासाठी ४२८ कोटी रुपये खर्च आला आहे. दिघा परिसरात मोठी लोकवस्ती असून, तिथं आयटी कंपन्याही आल्या आहेत. पण या स्थानकावर आजवर ट्रेन थांबत नव्हती. त्यामुळं रहिवाशी आणि नोकरदारांना ठाण्याला येण्यासाठी रिक्षा किंवा बसचा वापर करावा लागत होता. तसंच दिघा एमआयडीसीमध्ये  येणाऱ्या कामगार वर्गाला ऐरोली स्थानकात उतरावं लागत होते. पण आता लवकरच या रेल्वे स्थानकाची उभारणी होणार असून, ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी आज रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. विचारे यांनी गेल्या आठ वर्षांपासून दिघा स्थानकाच्या उभारणीसाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram