Sillod : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन सिल्लोडमध्ये तणाव ABP Majha
Sillod : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन सिल्लोडमध्ये तणाव ABP Majha
औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांदरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा विनापरवानगी पुतळा बसविल्याने तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात लोकांनी शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवला होता. त्यामुळे घटनास्थळी महसूल आणि पोलीस प्राशासन सकाळपासून गावात दाखल झाले आहेत. दरम्यान गावकरी पुतळा न काढण्याच्या भुमिकेवर ठाम असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून गावकऱ्यांची समजूत घालण्यात येत आहे. मात्र मोठा जमाव जमला असल्याने सद्या या गावात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.