CM Eknath Shinde : लवकरच नवी मुंबईतील मेट्रोचं उद्घाटन करणार : एकनाथ शिंदे
नवी मुंबई महापालिकेनं उभारलेल्या विविध प्रकल्पांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. त्यात नेरूळचं वंडर्स पार्क उद्यान, कोपरखैरणेचा ट्रिटमेन्ट प्लान्ट टर्शिअरी प्लान्ट, वाशीची बहुउद्देशिय इमारत आणि सानपाड्याची सेंट्रल लायब्ररी यांचा समावेश आहे. नवी मुंबईतील मेट्रोचंही लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या एमएमआरडीए परिसराला भविष्यात मेट्रोनं जोडण्यात येणार आहे.