Navi Mumbai : नवी मुंबईतला कुख्यात गुन्हेगार विकी देशमुखच्या घरावर बुलडोझर

Continues below advertisement

Navi Mumbai :  उत्तर प्रदेशच्या धर्तीवर नवी मुंबईत गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर फिरवून त्यांचं कंबरडं मोडण्याचा नवी मुंबई पोलिसांचा प्रयत्न आहे. नवी मुंबईतला कुख्यात गुन्हेगार विकी देशमुखच्या घरावर बुलडोझर फिरवून ते आज भुईसपाट करण्यात आलं. विकी देशमुखवर मोक्काचे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. तीन हत्या, बलात्कार, अपहरण, खंडणी आणि हत्येचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. क्राईम डीसीपी सुरेश मेंगडे आणि त्यांच्या पथकानं काही महिन्यांपूर्वी विकी देशमुखला अटक केली होती. पोलिसांनी त्याचे साथीदार आणि नातेवाईकांनाही अटक केली आहे. पण त्यानंतरही विकी देशमुखनं तळोजा जेलमध्ये असताना त्याला व्हीआयपी सुविधा मिळत नाहीत म्हणून आपल्या साथीदारांकडून जेल अधिकाऱ्यांवर गोळीबार करवून आणला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram