Ram Mandir Ayodhya: कापसे फाऊंडेशनमध्ये रामललासाठी रेशमी वस्त्र बनवण्याचे काम : ABP Majha
Continues below advertisement
नाशिकच्या येवला तालुक्यातील कापसे फाऊंडेशनमध्ये रामललासाठी चांदी सोन्याचे जर असणारे रेशमी वस्त्र बनवण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरु आहे. शेकडो दिव्यांग कारागीर आणि हजारो राम भक्तांचा हातभार या कार्यात लागला आहे. पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर प्रभू श्रीरामाची प्रतिमा आकार घेत आहे. राम मंदिराच्या कार्यात हातभार लागल्याने दिव्यांग, मूक कामगारांच्या आनंदाला पारावार उरला नाही, त्यांच्या सांकेतिक भाषेत हात उंचावून, धानुर्धारी रामाची पोझ देत जय श्रीरामचा नारा देत आहेत. हे वस्त्र बनवण्याचं काम कसं सुरु आहे, याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी
Continues below advertisement