Amruta Fadnavis : आपण ब्राह्मण समाजाचे असल्याचा गर्व, स्वाभिमानी ,ब्राह्मण बुद्धिजीवी आहोत
अमृता फडणवीस यांनी ब्रह्माण समाजाच्या दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपण ब्राह्मण असल्याचा गर्व व्यक्त केला, आम्ही स्वाभिमानी आहोत,ब्राह्मण बुद्धिजीवी आहेत, ब्राह्मण लोकांना मार्केटिंग जमत नाही, पण ते काम करत जातो, त्यातून त्याची प्रचिती येते, , देवेंद्र जी हे ही काम करत गेले मोदींजिनी त्यांना न मागता मुख्यमंत्री केले, समाजाचे काही प्रश्न असतील तर ते मिटले पाहिजे, समाजाच्या इमारत बांधण्याचा प्रश्न प्रलंबित आहेत त्यात कोणी अडचण निर्माण करत असेल तर सांगा अधिकऱ्याना टाईट करू अशी तंबी ही अमृता फडणवीस यांनी अधिकारी ना दिली. अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की, ज्या नगरीने दरवेळी वाईटाचा नाश केला, प्रभुरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन या नाशिकनगरीत येउन मी धन्य झाले. अखिल भारतीय बुहभाषीय ब्राम्हण महासंघ यांच्याशी काही वर्षांपासून माझे बोलणे सुरू आहे. जात, धर्म वेगळा ठेवून महासंघ काम करतयं. ब्राम्हण महापुरूष होते ज्यांनी देशाच्या स्वातंत्रयासाठी खुप काही केले. आज अखिल भारतीय बुहभाषीय ब्राम्हण महासंघ लोकांमध्ये जाउन काम करतयं. केवळ समाजासाठी नव्हे तर प्रत्येक समाजात काम करताहेत. कोरोनातही पुढे येउन जात, धर्माचा विचार न करता काम केले.