Veer Dajiba Bashing festival | धुळीवडीनिमित्त नाशिक शहरात वीर दाजीबा बाशिंग मिरवणूक | ABP Majha

Continues below advertisement
धुळीवडीनिमित्त नाशिक शहरातील पारंपरिक वीर दाजीबा बाशिंग मिरवणुकीची सुरूवात झाली आहे. बाशिंगे वीर अशी या वीरांची ख्याती असून विविध देवांची वेशभूषा ते परिधान करतात. डोक्याला भरजरी वस्त्रे, कानात सोन्याच्या पगड्या, हातात सोन्याचे कडे, पायात जोडा असा वेष धारण करून वाजत गाजत या वीर दाजीबाची मिरवणूक निघते. घरासमोर रांगोळी काढत तसेच ठिकठिकाणी औक्षण करत या दाजिबांचे स्वागत केले जाते, दाजिबांवर फुलांचा वर्षावही केला जातो. 300 वर्षांपासूनची ही परंपरा असून जून्या नाशकातील बेलगावकर यांच्याकडे 40 वर्षांपासून हा मान देण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram