Vitthal Rukmini Temple | विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चार मूर्ती बदलणार | ABP Majha

Continues below advertisement
पंढरपुरातील परिवार देवतांच्या झिजलेल्या चार मूर्ती बदलण्याच्या हालचाली मंदिर समितीनं सुरु केल्या आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील व्यंकटेशजवळील गणपती, शनिमंदिराजवळील गणपती या मूर्तींना मागील 25 वर्षापासून शेंदूर आणि बेलीचा लेप लावण्यात येतो. यामुळे मूर्तींच्या काही अवयवांची झीज झाली आहे. तसेच त्रिंबकेश्वर मंदिरा शेजारील भैरोबाची मूर्ती दुभंगली आहे. विष्णूपद मंदिरातील विष्णूची मूर्तीचीही झीज झाली आहे. या मूर्ती दर्शनासाठी ठेवणे योग्य नसल्याने त्या धार्मिक पद्धतीने बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram