Nashik : शासकीय विश्रामगृहात विनापरवाना ऑडिशन, विचारणा करताच तरुण तरुणींचा काढता पाय
नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात चित्रपटाचं ऑडिशन सुरु आहे. सकाळपासून विश्रामगृहाच्या सूटमध्ये तरुण तरुणींचं विनापरवानगी ऑडिशन सुरू होतं. शासकीय विश्रामगृहावर चित्रपटाच्या ऑडिशनला परवानगी कशी? असा सवाल उपस्थित केला जातोय.. विचारणा झाल्यानंतर आयोजकांनी काढता पाय घेतला